Home Accident News Accident: संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी जखमी

Accident: संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकरी जखमी

Accident Farmer injured in unidentified vehicle collision

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील नगर रोडवरील समनापूर येथील फ्लावर मार्केटजवळ दुपारी एक वाजेच्या सुमारास अज्ञात कारने समोरून शेतकऱ्यास जोरात धडक दिल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. कारचालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे.

नगर रोडवरील समनापूर परिसरात फ्लावर मार्केट रस्त्याच्या कडेला भरत असते. या ठिकाणी शेतकरी, व्यापारी वर्गाची मोठी गर्दी तसेच ये जा करणारी वाहने यांची वर्दळ असते. आज बुधवारी दुपारी  एक वाजेच्या सुमारास लोणीवरून संगमनेरच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या एका कारने शेतकरी रस्ता ओलांडत असताना जोराची धडक दिली. या धडकेने डोक्याला व कानाला गंभीर दुखापत झाली. परिसरात असलेल्या नागरिकांनी शेतकऱ्यास शहरातील खासगी रुग्नालायात दाखल केले. कारचालक मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे. यावेळी नागरिकांनी संताप व्यक्त केला. या ठिकाणाची वर्दळी व्यवस्था लक्षात घेता उपाययोजना करावी अशी मागणी व्यापारी वर्गाने केली आहे.

Web Title: Accident Farmer injured in unidentified vehicle collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here