Home अहमदनगर अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणातील आरोपीस अटक

अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणातील आरोपीस अटक

Crime news Accused arrested in child abuse case

राहुरी | Crime News: राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार असलेल्या आरोपीला साडे तीन वर्षानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

अंकुश सोपान बर्डे रा. बारागाव नांदूर ता. राहुरी असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अत्याचार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

एप्रिल 2018 मध्ये बर्डे व त्याच्या इतर साथीदारांनी राहुरी तालुक्यातील एका व्यक्तीच्या घरातून अल्पवयीन मुलीला  पळवून नेत त्या मुलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. गेल्या साडेतीन वर्षांपासून आरोपी बर्डे पसार होता. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे पथक पसार आरोपीचा शोध घेत असताना त्यांना आरोपी बर्डे राहुरी बस स्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार निरीक्षक कटके यांनी सदर ठिकाणी सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय हिंगडे, सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, विशाल दळवी, शंकर चौधरी, सागर ससाणे, रणजित जाधव हे पथक पाठविले. या पथकाने आरोपी बर्डे यास अटक केली असून करून राहुरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Web Title: Crime news Accused arrested in child abuse case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here