पतंगाच्या मागे धावणाऱ्या चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू
सिन्नर | Accident: पतंग पकडण्यासाठी धावत असताना अंदाज ना आल्याने ७ वर्षाच्या चिमुकल्याचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना सिन्नरमध्ये घडली.
प्रज्वल पांडुरंग आव्हाड वय ७ हा ३ मित्रांसमवेत पतंग उडवत होता. पतंगामागे धावताना विहीर जवळ असल्याचे त्याच्या लक्षात आले नाही. तो सरळ विहिरीत पडला. त्याच्या पाठीमागे असलेले तिघेही जण सावध झाले. त्यांनी प्रज्वल्ला हाका मारल्या मात्र कोणताही प्रतिसाद ना मिळाल्याने सर्वजण मोठ्याने रडू लागले. घरी येऊन रडत रडत घडलेली घटना सांगितली. जवळ राहणाऱ्या उपनगरातील नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावून प्रज्वलचा शोध घेण्यात आला. अडीच तासानंतर शोध घेण्यात आला. त्याच्यावर दोडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी या घटनेची नोंद केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माळी हे करीत आहे.
Web Title: Sinnar Accident fell into a well and died