Home Accident News Accident: फ्लेक्स बोर्डने घेतला तरुणाचा जीव, प्रशासनाचे दुर्लक्ष

Accident: फ्लेक्स बोर्डने घेतला तरुणाचा जीव, प्रशासनाचे दुर्लक्ष

Accident Flex board took the life of a young man

अहमदनगर| Ahmedagar | Accident:  वाढदिवसाचा फ्लेक्स बोर्ड लावत असताना एका तरुणाला विजेचा धक्का बसल्याने त्याचा खाली पडून डोक्याला मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  सौरभ सुरेश चौरे (वय २२ रा. नालेगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. गुरूवारी पहाटे सावेडी उपनगरातील प्रोफेसर काॅलनी चौकात ही घटना घडली.

गुरुवारी पहाटे सौरभ चौरे हा तरुण प्रोफेसर कॉलनी चौकात वाढदिवसाचे फ्लेक्स लावत असताना त्याला विजेचा धक्का बसला. यामुळे तो जमिनीवर कोसळला. त्याच्या डोक्याला मार लागला होता.

जखमी सौरभला उपचारासाठी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहायक फौजदार केदार करीत आहेत.

दरम्यान शहरातील अनधिकृत फ्लेक्स बोर्डने यापूर्वी अनेकांचे बळी गेले आहे. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे.

Web Title: Accident Flex board took the life of a young man

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील दररोजच्या नवीन अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा: संगमनेर अकोले न्यूज- अहमदनगर लाईव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here