Home क्राईम घुलेवाडी शिवारात नग्नावस्थेत मृतदेह आढळलेल्या महिलेच्या खुनातील आरोपी गजाआड

घुलेवाडी शिवारात नग्नावस्थेत मृतदेह आढळलेल्या महिलेच्या खुनातील आरोपी गजाआड

Sangamner Accused of murder a woman whose body was found 

संगमनेर | Murder case: संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घुलेवाडी शिवारात महिलेचा खून करून मृतदेह नग्नावस्थेत सेफ्टी टंक फेकून देण्याचा प्रकार दिनांक २२ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आला होता, याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर आरोपीस संगमनेर शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने छडा लावत कोपरगाव येथून आरोपीस अटक करण्यात आली आहे. रुपचंद मुकुतराम वर्मा वय ४६ रा. छातीसगढ असे या आरोपीचे नाव आहे.आरोपीने स्वतः या खुनाची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घुलेवाडी शिवारात श्रमिक बिडी उद्योग संस्थेच्या मोकळ्या जागेत असलेल्या सेप्टी टंक मध्ये महिलेचा मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने टाकून देण्यात आला होता. शरीरसंबंधास नकार दिल्याने अत्याचार करीत लाकडी दांडक्याने माराहणव चाकूने वार करीत महिलेचा खून करण्यात आला.  या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले करीत आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. सदर आरोपी हा कोपरगाव शहरातील धरणगाव रोड परिसरात असल्याची माहिती कोपरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार कोपरगाव पोलिसांच्या पथकाने तेथे जाऊन आरोपीस गजाआड केले आहे. महिलेच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस ताब्यात घेतल्याने याबाबत माहिती समोर येणार आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, डीवायएसपी संजय सातवा यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव व संगमनेर पोलीस ठाण्याचे पोलीस यांनी ही कारवाई केली आहे.

Web Title: Sangamner Accused of murder a woman whose body was found 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here