Home महाराष्ट्र नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून घसरले,एक ठार, पाच जखमी

नाशिकमध्ये पवन एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरून घसरले,एक ठार, पाच जखमी

Accident Four coaches of Pawan Express derailed in Nashik

नाशिक | Nashik: नाशिकमध्ये एलटीटी जयनगर पवन एक्स्प्रेसचे चार डब्बे रुळावरुन घसरल्याची दुर्घटना रविवारी दुपारी ३ वाजून १० मिनिटांच्या सुमारास घडली आहे. नाशिकजवळील लहवित- देवळाली स्थानकाच्या दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरुन घसरल्याची धक्कादायक घटना घडली. या दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून पाच प्रवासी जखमी झाले आहेत. रेल्वे प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनस्थळी बचाव कार्य सुरु आहे. तसेच अपघातग्रस्त (Accident) रिलीफ ट्रेन आणि मेडिकल व्हॅन घटनास्थळी दाखल झाले आहेत.

11061 एलटीटी जयनगर पवन एक्स्प्रेसचे डाऊन मार्गावर देवळाली-लहवीत दरम्यान दुपारी 3.10 वाजता रेल्वेरुळावरुन चार डबे घसरले. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून पाच प्रवासी जखमी झाले असून रेल्वे पोलिस, वैैद्यकीय पथक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. ही घटना नेमकी कशामुळे घडली याचे अद्याप कारण समजू शकले नाही. 

Web Title: Accident Four coaches of Pawan Express derailed in Nashik

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here