Home महाराष्ट्र Rain Alert: या जिल्ह्यांना अलर्ट जारी, राज्यात वारे व गडगडाटासह पाऊस बरसणार

Rain Alert: या जिल्ह्यांना अलर्ट जारी, राज्यात वारे व गडगडाटासह पाऊस बरसणार

Rain Alert Alerts have been issued to these districts and it will rain with wind

मुंबई | Rain Alert : मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. विदर्भात उष्णतेची लाट (Heat Wave) आहे. आता उन्हाच्या झळा कमी होऊन राज्यात पुन्हा पावसाचं आगमन होणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांत काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची (Rain Alert) शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे.

मार्च महिना सुरू होताच तापमानात चांगलीच वाढ झाली. पूर्ण मार्च महिन्यात उन्हाचा तडाखा जाणवला. राजस्थानसह काही राज्यातील लाटसृश्य वातावरणामुळे विदर्भात देखील उष्णतेची लाट आली. गेल्या २९ एप्रिलपासून २ एप्रिलपर्यंत उष्णतेची लाट काय होती. अकोला, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, बुलडाणा या जिल्ह्यांतील नागरिकांना उन्हाच्या सर्वाधिक झळा बसल्या. तापमान तब्बल ४२ अंशाच्या वर पोहोचले होते. पण, आता चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. आज सायंकाळपर्यंत दोन्ही जिल्ह्यात जोरदार वाऱ्यासह पावासाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

येत्या ५ एप्रिलला कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापुरात दमदार पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच ६ एप्रिलला देखील या चारही जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला असून सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि गडगडाटासह पावसाची शक्यता आहे.

Web Title: Rain Alert Alerts have been issued to these districts and it will rain with wind

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here