Home संगमनेर Accident: संगमनेर ब्रेकिंग: नाशिक पुणे महामार्गावर कारचा अपघात

Accident: संगमनेर ब्रेकिंग: नाशिक पुणे महामार्गावर कारचा अपघात

Sangamner Car accident on Nashik-Pune highway

Sangamner | संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील खालची माहूली परीसरात कार उलटुन अपघात (Accident) झाल्याची घटना रविवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एक जण गंभीर तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, संगमनेरहुन पुण्याच्या दिशेने चाललेली कार क्रमांक (एम एच १५ इ बी ४५२५) ही रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान माहुली परीसरातील साईबाबा मंदिर परीसरात आली असता वाहन चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही कार रस्त्याच्या बाहेरील बाजूस लावलेल्या संरक्षण कठड्यावर जाऊन जोरदार आढळून महामार्गावर येऊन उलटली. ही कार उलटल्याने द्रौपदाबाई जगन्नाथ मोरे (वय ७५) या गंभीर जखमी झाल्या तर प्रकाश कृष्णराव गवळी (वय ६१) कविता प्रकाश गवळी (वय५५),प्रगती राजेंद्र मोरे (वय ५६) हे किरकोळ जखमी झाले. जखमींना संगमनेर येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

दरम्यान घटनेची माहिती समजताच आजुबाजुच्या नागरीकांसह सामाजिक कार्यकर्ते योगेश भोसले यांनी घटनास्थळी धाव घेत  मदत कार्य केले.आणि जखमींना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात पाठविण्यात आले.

Web Title: Sangamner Car accident on Nashik-Pune highway

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here