धक्कादायक! इमारतीच्या डक्टमध्ये आढळला अल्पवयीन मुलीचा मृतदेह
पुणे | Pune Crime: खडकवासला परिसरातून धक्कादायक माहिती समोर आली. चिंतामणी हाइटस सोसायटीतील इमारतीच्या डक्टमध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह (Dead Body) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मयत मुलगी 16 वर्षाची असून इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. हीना शब्बीर पठाण असे मयत मुलीचे नाव आहे. ही मुलगी पाच दिवसांपासून बेपत्ता होती. याबाबत तिच्या आईने पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटना स्थळावर हजर झाले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चिंतामणी हाईट्स सोसायटीतील एका रहिवाशाने दुर्गंधी येत असल्याने खिडकीतून खाली डोकावून पहिले. त्यावेळी त्यांना इमारतीच्या डक्टमध्ये मृतदेह आढळून आला. त्यांची तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस दलातील उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढाेले, हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक निरीक्षक नितीन नम आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अग्नीशामक दलाला पाचारण करत डक्टमध्ये मृतदेह बाहेर काढला. मात्र मृतदेह सडल्यामुळे त्याची ओलाझ पटवणे अवघड जात होते. याच दरम्यान पोलिसांनी आजूबाजूला चौकशी केली असता त्यांना सोसायटीतील मुलगी गायब असल्याची माहिती मिळाली त्यांनुसार तपास केला असता संबंधित मृतदेह पीडित मुलीचाच असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी हवेली पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: Dead body of a minor girl was found in the duct of the building