Home Accident News लग्न आटोपून परतताना कार उलटून भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

लग्न आटोपून परतताना कार उलटून भीषण अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

Latur Accident News: चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं पुलाखाली कार पलटी, या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक.

Accident Four members of the same family died in a car overturn while returning from the wedding

लातूर: पुण्याहून लग्न आटोपून परतताना कुटुंबावर काळाचा घाला. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू. लातूरच्या चलबुर्गा पाटीजवळ कार उलटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.  निलंगा महामार्गावर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून लातूर येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्याहून लग्न समारंभ आटपून गावी परतताना भीषण अपघात झाला. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं पुलाखाली कार पलटी झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सर्व व्यक्ती निलंगा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. निलंगा येथील रहिवासी सचिन बडूरकर (रा. दत्तनगर) हे कुटुंबासह पुणे येथून निलंग्याकडे येत होतं. दरम्यान, कार रस्त्याच्या खाली जाऊन पलटली. त्यात सचिन यांची दोन मुलं, एक पुतण्या आणि एक मेव्हणा जागीच ठार झाले. तर सचिन बडूरकर, त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातातील जखमींवर लातूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.

Web Title: Accident Four members of the same family died in a car overturn while returning from the wedding

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here