Home क्राईम ‘मोठं सेक्स रॅकेट‘ उघडकीस, विद्यार्थिनीकडून देहव्यवसाय, ग्राहकांकडून घ्यायचे ४ ते ५ हजार...

‘मोठं सेक्स रॅकेट‘ उघडकीस, विद्यार्थिनीकडून देहव्यवसाय, ग्राहकांकडून घ्यायचे ४ ते ५ हजार रुपये…

‘सेक्स रॅकेट‘ (Sex Racket) वर ग्रामीण पोलिसांनी छापा, धक्कादायक म्हणजे महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला आंबटशौकीन ग्राहकाच्या खोलीतून ताब्यात, तरुणींना शिक्षणासाठी पैसा लागत असल्यामुळे देहव्यवसाय, ग्राहकांकडून ४ ते ५ हजार रुपये घेऊन सौदा.

Big sex racket exposed, prostitution from the student, 4 to 5 thousand rupees from customers

नागपूर: नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पारशिवनीजवळील नयाकुंड परिसरात असलेल्या ड्रिमविला फॅमिली रेस्ट्रॉरेंट आणि लॉजिंग येथे सुरू असलेल्या ‘सेक्स रॅकेट‘वर ग्रामीण पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीला आंबटशौकीन ग्राहकाच्या खोलीतून ताब्यात घेण्यात आले. विद्यार्थिनीकडून देहव्यवसाय करवून घेणाऱ्या रेस्ट्रॉरेंटच्या व्यवस्थापक आणि सहायकाला पोलिसांनी अटक केली. शुभम कारेमोरे (३०, सावनेर) आणि सुनील चंद्रभान मेश्राम (४०, उमेरड बायपास, सावनेर) अशी दलाल आरोपींची नावे आहेत.

सुनील मेश्राम हा ड्रिमविला फॅमिली रेस्ट्रॉरेंटमध्ये व्यवस्थापक होता. या हॉटेलमध्ये अनेक आंबटशौकीन ग्राहक येत होते. पार्टी करण्यासाठी वारंवार तरुणींची मागणी करीत होते. त्यामुळे शुभम कारेमोरे याने झटपट पैसा कमविण्यासाठी तरुणींचा शोध घेतला. पाच तरुणी देहव्यापारासाठी तयार झाल्या. त्या तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. त्यांना शिक्षणासाठी पैसा लागत असल्यामुळे त्या देहव्यवसाय करण्यासाठी तयार झाल्या. तरुणींना शुभमने प्रतिग्राहक ५०० रुपये असा सौदा ठरवला. शुभम आणि सुनील हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांकडून ४ ते ५ हजार रुपये घेत होता.

हॉटेलमध्ये तरुणींची ये-जा वाढल्यामुळे अनेक आंबटशौकीन शनिवारी-रविवारी पार्टीसाठी येत होते. ही माहिती पोलीस उपाधीक्षक राजेंद्र निकम यांना मिळाली. त्यांनी बोगस ग्राहक पाठवला. शुभमने बनावट ग्राहकाशी ५ हजारांत सौदा केला. तरुणीला ठेवलेल्या खोलीत त्या ग्राहकाला पाठवण्यात आले. काही वेळातच ग्राहकाने पोलिसांना इशारा केला. पोलिसांनी लगेच छापा घालून तरुणीला ताब्यात घेतले. तर तिच्याकडून देहव्यापार करवून घेण्याऱ्या सुनील आणि शुभमला अटक केली. गेल्या अनेक दिवसांपासून दोघेही हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवित असल्याची कबुली आरोपींनी दिली.

Web Title: Big sex racket exposed, prostitution from the student, 4 to 5 thousand rupees from customers

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here