Home पुणे तृप्ती देसाईंचा इंदोरीकर महाराजांना सवाल, गौतमी पाटीलला दिलेल्या मानधनामुळे………

तृप्ती देसाईंचा इंदोरीकर महाराजांना सवाल, गौतमी पाटीलला दिलेल्या मानधनामुळे………

Gautami Patil:  गौतमी पाटीलला दिलेल्या मानधनामुळे तुमच्या पोटात का दुखतय? असा सवाल तृप्ती देसाई यांनी कीर्तनकार इंदुरीकर यांना केला.

Why does your stomach hurt because of the remuneration given to Gautami Patil Question by Tripti Desai

पुणे: गेल्या काही दिवसांपासून गौतम पाटीलची लावणी अदाकारीमुळे राज्यभर चर्चा सुरु आहे. राज्यातील तरुणाईला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटल की प्रचंड गर्दीचा माहोल असतो. यात तिच्या अदाकारीने अनेकांना भुरळ घातली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी व्हिडिओमधील डान्स स्टेप्समुळे गौतमी वादाच्या भोवऱ्यात अडकली. तसेच छुप्या पद्धतीने तिचा व्हिडिओ काढल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली होती. मात्र, यातच आता प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटीलसंदर्भात विधान केले होते.

गौतमीच्या तीन गाण्यासाठी तीन लाख मोजण्याची तयारी असते पण आम्हाला टाळ वाजवूनही काही मिळत नाही. आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला असा आरोप होतो. मात्र गौतमीने तीन गाणे वाजविले की तीन लाख रुपये मोजतात असे ते एका कीर्तनात नाव न घेता म्हणाले होते. त्यावरून गौतमी पाटीलला दिलेल्या मानधनामुळे तुमच्या पोटात का दुखतय? असा सवाल तृप्ती देसाई यांनी कीर्तनकार इंदुरीकर यांना केला आहे. महिला आपल्यापुढे गेलेली बघवत नाही म्हणूनच इंदुरीकरांनी गौतमी पाटीलवर टीका केल्याचा मत  देसाई यांनी व्यक्त केले आहे. तर इंदुरीकर तुमचा ब्लॅकचा पैसा कुठे जातो असा सवालही इंदुरीकर यांना देसाई यांनी केला आहे.

तसेच लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनीही गौतमी पाटीलवर निशाणा साधला होता. कलावंत पोट भरण्यासाठी धडपडतो. पोटासाठी प्रत्येकजण काहीतरी करतो. मात्र जे करायचे आहे, ते चांगले करावे. गौतमी पाटील हिची लावणी नसून डीजे डान्स आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Web Title: Why does your stomach hurt because of the remuneration given to Gautami Patil? Question by Tripti Desai

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here