Home अहमदनगर अहमदनगर: शेतात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

अहमदनगर: शेतात विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

Ahmednagar News: जंगली जनावरांपासून पिक संरक्षणासाठी त्यात सोडलेल्या विजप्रवाहाचा (Electric Shock) धक्का बसून शेजारील उसाच्या पिकास पाणी देण्यासाठी आलेल्या तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना.

Ahmednagar young man died due to electric shock in the field

नेवासा | Nevasa: मकाच्या पिकाभोवती तारेचे कुंपन बांधून जंगली जनावरांपासून पिक संरक्षणासाठी त्यात सोडलेल्या विजप्रवाहाचा धक्का बसून शेजारील उसाच्या पिकास पाणी देण्यासाठी आलेल्या तरुण शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील जळके खुर्द  येथे घडली. याबाबत दाखल फिर्यादीवरुन मका पिकाच्या शेतमालकावर मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मन्सूर महंमद पठाण (वय 29) धंदा-शेती रा. जळके खुर्द ता. नेवासा यांनी फिर्याद दाखल केली आहे.  यामध्ये  रविवार 26 मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता माझा माठा भाऊ अजीज महंमद पठाण (वय 33) हा आमचे गावच्या शिवारातील गट नं. 220/4 मध्ये पाटचारीला पाणी आल्याने उसाच्या पिकास पाणी देण्यासाठी गेला होता. बराच वेळ झाला मात्र त्याच्याशी फोनवर संपर्क न झाल्याने त्यास पाहण्यासाठी दुपारी साडेतीन वाजता शेतात गेलो असता तो शेतातत दिसून आला नाही. शेतातकडे येणारे पाणी कमी झाल्याचे दिसल्याने भाऊ अजीज हा पाटाच्या चारीकडे पाणी पाहण्यास गेला असावा असे वाटल्याने मी त्याचा चारीने शोध घेत जाताना मला अशोक पंढरीनाथ काळे यांच्या शेतातील मकाच्या बांधावर भाऊ अजीज पठाण हा पालथ्या अवस्थेत पडलेला दिसला.

अशोक काळे याचे शोतातील मकाचे पिकाचे जंगली जनावरांपासून संरक्षण व्हावे यासाठी काठीच्या सहाय्याने लोखंडी तारेच्या केलेल्या कुंपनाला त्याचा हात व पायाला विद्युत शॉक लागलेला दिसला. तेव्हा मी अमोल आसाराम काळे यास फोन लावून माहिती देवून बोलावून घेतले तसेच वडील व चुलत भाऊ यांना बोलावून घेतले. भाऊ अजीज यास उपचारासाठी नेवासाफाटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तो मयत असल्याचे सांगितले. तेव्हा डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू दाखल केला. शवविच्छेदनानंतर मृतदेह आमच्या ताब्यात दिला. त्यानंतर आम्ही त्याचा दफनविधी केला.

अमोल अशोक काळे व प्रवीण अशोक काळे दोघेही रा. जळका बुद्रुक ता. नेवासा यांनी बांधावर लोखंडी तारेचे कम्पाऊंड करुन त्यामध्ये अनधिकृतरित्या विद्युत प्रवाह सोडून जिवीतास धोका उत्पन्न होईल असे माहित असताना देखील सदर शेतास तरेच्या कम्पाऊंडमध्ये विद्युतप्रवाह सोडल्याने माझा भाऊ अजीज महंमद पठाण (वय 33) रा. जळके खुर्द याला लोखंडी तारेचा इलेक्ट्रीक शॉक लागून तो मयत झाला.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी अमोल अशोक काळे व प्रवीण अशोक काळे या दोघांवर गुन्हा रजिस्टर 354/2023 भारतीय दंड विधान कलम 304, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Ahmednagar young man died due to electric shock in the field

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here