Home अहमदनगर एकाच वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन मुली दहावीच्या  पेपरनंतर बेपत्ता

एकाच वर्गात शिक्षण घेत असलेल्या दोन मुली दहावीच्या  पेपरनंतर बेपत्ता

Ahmednagar News: दोन्ही अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले, अपहरणचा गुन्हा दाखल, पालक वर्गात चिंतेचे व भितीचे वातावरण.

Two girls studying in the same class go missing after their 10th paper

राहुरी:  राहुरी तालुक्यातील विद्यापीठ परिसरात २५ मार्च रोजी दहावीचा अंतिम  पेपर दिल्यानंतर दोन अल्पवयीन मुलींचे अज्ञात तरुणांनी अपहरण केल्याची घटना घडली. असून या घटनेमुळे पालक वर्गात चिंतेचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुलींच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून अज्ञात तरुणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील दोन्ही अल्पवयीन मुली एकाच वर्गात शिक्षण घेत होत्या. त्या दोघी शनिवारी दहावीचा पेपर देण्यासाठी विद्यापीठ येथे गेल्या होत्या. त्या दोघी उशीरापर्यंत घरी परत आल्या नाहीत. त्यामुळे घरच्या लोकांनी त्यांचा परिसरात शोध घेतला. मात्र, त्या मिळून आल्या नाहीत.

सदर दोन्ही अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले असल्याबाबत मुलींच्या नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला.त्या मुलींच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरून अज्ञात तरुणां विरोधात गुन्हा रजि. नं. 327/2023 भादंवि कलम 363 प्रमाणे अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे.

Web Title: Two girls studying in the same class go missing after their 10th paper

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here