Home क्राईम तीन लाखांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण, सिनेस्टाईलने मुसक्या आवळल्या

तीन लाखांच्या खंडणीसाठी अल्पवयीन मुलीचे अपहरण, सिनेस्टाईलने मुसक्या आवळल्या

Beed Crime: अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून २५ मार्च रोजी अपहरण केल्याची घटना, सिनेस्टाईल पद्धतीने अवघ्या १४ तासांत रविवारी दुपारी भिगवण येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

Kidnapping of a minor girl for a ransom of three lakhs

आष्टी | कडा: तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून २५ मार्च रोजी अपहरण केल्याची घटना घडली होती. आष्टी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात  आला होता. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत सिनेस्टाईल पद्धतीने अवघ्या १४ तासांत रविवारी दुपारी भिगवण येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. आकाश बंडगर (२६) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी तांत्रिक माहितीचा आधार घेत थेट भिगवण गाठले. मुलीच्या वडिलांकडे वेगवेगळ्या फोनवरून वारंवार तीन लाख रुपये खंडणीची मागणी करणाऱ्या आरोपीला रविवारी दुपारी पोलिसांनी सापळा रचून आम्ही पैसे घेऊन भिगवण-इंदापूर रोडवर उभे असल्याचे सांगितले. आरोपी पैसे घ्यायला तिथे येताच त्याच्या मुसक्या आवळल्या. तेथील एका हॉटेलमधील खोलीत त्याने मुलीला कोंडून ठेवले होते. तिची सुखरूप सुटका करत वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: Kidnapping of a minor girl for a ransom of three lakhs

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here