Home क्राईम धक्कादायक! 50 हजारांसाठी पुण्यातील अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेशमध्ये विकले

धक्कादायक! 50 हजारांसाठी पुण्यातील अल्पवयीन मुलीला मध्य प्रदेशमध्ये विकले

५० हजार रुपयांसाठी पुण्यातील १४ वर्षीय मुलीचा मध्य प्रदेशमध्ये सौदा झाल्याचा धक्कादायक प्रकार.

minor girl from Pune was sold to Madhya Pradesh for 50 thousand

Pune News : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ५० हजार रुपयांसाठी पुण्यातील १४ वर्षीय मुलीचा मध्य प्रदेशमध्ये सौदा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवघ्या ५० हजार रुपयांसाठी अल्पवयीन मुलीला विकून तिचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना  अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  पुण्यातील अल्पयवीन मुलीला ५० हजार रुपयांसाठी १४ वर्षीय मुलीचा मध्य प्रदेशमध्ये सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अल्पवयीन मुलीला विकून तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. अल्पवयीन मुलीला पुण्यातून (Pune) पळवून नेऊन मध्य प्रदेशमध्ये विकणाऱ्या २ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. . या प्रकरणी शांती उर्फ सांतो (४०) आणि धर्मेंद्र (२२) असे अटक केलेल्या या आरोपींची नावे आहेत.

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीची पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशमध्ये जाऊन सुटका केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अल्पवयीन मुलीची मोठी बहीण पुण्यातील एका वर्कशॉप मध्ये काम करत होती. त्यावेळी या तरुणीची ओळख शांतीशी झाली. शांतीने या तरुणीला तिच्या आवडीचा असलेल्या मुलाशी लग्न लावून देते असे खोटे आश्वासन देऊन तिला मध्य प्रदेश या ठिकाणी नेले.

मध्य प्रदेशमध्ये नेऊन शांतीने या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने अवघ्या ५० हजार रुपयांसाठी धर्मेंद्र यादव या आरोपीशी  लग्न लावून दिले. दरम्यान, धर्मेंदने शांतीला करण्यासाठी एक मुलगी शोध आणि पैसे घे असे सांगितल्याने हा सगळा प्रकार शांतीने केला. पोलिसांनी या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी मध्य प्रदेश गाठले आणि आरोपींना अटक केली.

Web title: minor girl from Pune was sold to Madhya Pradesh for 50 thousand

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here