Home Accident News Accident: घाटात चारचाकी गाडी 400 फूट दरीत कोसळली

Accident: घाटात चारचाकी गाडी 400 फूट दरीत कोसळली

Accident four-wheeler crashed into a 400-foot ravine in the ghat amba 

रत्नागिरी: रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर आंबा घाटात एक चारचाकी गाडी 400 फूट दरीत कोसळून भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली.  या चार चाकी गाडीत सहा जण  प्रवास करीत होती. यापैकी दोन जणांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. आंबा घाटातील गायमुखच्या आधीच्या वळणावर हा अपघात झाला. साखरपा पोलिस आणि स्थानिकांकडून आंबा घाटात रेस्क्यु ऑपरेशन सुरु आहे. या अपघातात एक महिन्याचे बाळ आणि एक महिला ठार झाली आहे. संरक्षक भिंत आणि गार्ड नसल्याने अपघात झाल्याचे समजते.

सांगली येथील डॉक्टर हरकूडे आणि डॉक्टर फुलारे कुटुंबीय गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात घडला. दोन वेगवेगळ्या गाड्यांमधून हे निघाले होते. विसावा पॉइंट या ठिकाणी फोटोग्राफी करून यातील एक गाडी गणपतीपुळे दिशेने निघाली. यामागे येणाऱ्या दुसऱ्या गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या अपघातात एक महिला आणि हरकूडे कुटुंबातील एक महिन्याचे बाळ मृत्यू झाल्याचे समजते. पोलिसांचे रेस्कू ऑपरेशन सुरु आहे.

Web Title: Accident four-wheeler crashed into a 400-foot ravine in the ghat amba 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here