Home महाराष्ट्र Accident:  घाटात ट्रक तब्बल १५० फुट दरीत कोसळला

Accident:  घाटात ट्रक तब्बल १५० फुट दरीत कोसळला

Mumbai Goa Expressway Truck Accident:  मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एका मालवाहू ट्रकचा भीषण अपघात.

Accident ghat, the truck fell into a 150 feet ravine

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात एका मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक तब्बल १५० फुट दरीत कोसळला आहे. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने मुंबईच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी १० वाजेच्या सुमारास भोगाव गावाच्या हद्दीत हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, ट्रक अंदाजे १५० फूट दरीत कोसळला. हा ट्रक आंध्र प्रदेशातील रोहा MIDC मध्ये क्लोरीन गॅसचे सिलेंडर घेऊन हा ट्रक जात होता.

दरम्यान, कशेडी घाटातील भोगाव हद्दीतील तीव्र उतारावर ट्रक आला असता, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट १५० फूट दरीत जाऊन कोसळला. या भीषण अपघातात ट्रकचालक गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळातच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकाला रुग्णालयात दाखल केले.

Web Title: Accident ghat, the truck fell into a 150 feet ravine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here