Home पुणे पर्यटनासाठी गेलेले सात जण धरणात बुडाले, दोघांचा बुडून मृत्यू तर

पर्यटनासाठी गेलेले सात जण धरणात बुडाले, दोघांचा बुडून मृत्यू तर

Pavana Dam Drowned: सात जण धरणाच्या जलाशयात बुडाल्याची दुर्घटना आज दुपारी घडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला.

Seven tourists drowned in the dam, two Death

मावळ: मावळातील पवना धरण परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पर्यटनाकरिता मुंबई येथील एका ग्रुपमधील सात जण धरणाच्या जलाशयात बुडाल्याची दुर्घटना आज दुपारी घडली. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर अन्य पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की,  समीर कुलदीप सक्‍सेना (वय ४३), पत्‍नी पायल सक्‍सेना (वय ४२) त्‍यांची दोन मुले व मुलांचे मित्र असे सात जण पवना धरण परिसरात फिरायला आले होते. या दरम्‍यान ते फांगणे गावाच्‍या हद्दीत पाण्यात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात ते सर्वजण बुडाले. सदरची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना कळताच पोलीस घटना स्थळावर आले.

दरम्यान आर्या दीपक जैन (वय १३), समीर कुलदीप सक्सेना यांना पाण्यातून बाहेर काढले आहे. मात्र ते दोघेही मयत झाले असून इतर सर्वांना वाचविण्यात यश आले आहे. अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे.

Web Title: Seven tourists drowned in the dam, two Death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here