Home क्राईम Sangamner Theft: संगमनेरात घर फोडून ऐवज लंपास

Sangamner Theft: संगमनेरात घर फोडून ऐवज लंपास

Sangamner Theft News:  घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करीत चोरट्यांनी ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास.

breaking the house in Sangamaner theft

संगमनेर: संगमनेर पंचायत समितीच्या आवारात घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करीत चोरट्यांनी ५० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर पंचायत समितीच्या आवारात असलेल्या बाभळेश्वर बिल्डींगमध्ये राहत असलेल्या मधुकर रामचंद्र देवकर हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बाळेश्वर बिल्डींग व निझर्णेश्वर बिल्डींग मध्ये प्रवेश करत दरवाजांचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. 20 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, वंदना विक्रम नवले यांच्या घरातील 10 ग्रॅम सोन्याचे दागिने अंदाजे 27 हजार 500 रुपये किमतीचे, व एक लेडीज घड्याळ असा एकूण 47 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.

याप्रकरणी मधुकर देवकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 749/2022 भारतीय दंड संहिता 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल महाजन करत आहेत.

Web Title: breaking the house in Sangamaner theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here