Murder: धारदार शस्त्राने भोकसून वाईन शॉपच्या मॅनेजरचा खून
Nanded Murder: दारूच्या पैश्याच्या कारणावरून काही तरुणांसोबत वाईन शॉप व्यवस्थापक माधव वाकोरेंचा वाद झाल्याने मारहाण करीत वार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे.
शहरातील ढवळे कॉर्नर परिसर येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. माधव जीवनराव वाकोरे असं खुन झालेल्या व्यवस्थापकाच नाव आहे. दारुच्या पैश्याच्या कारणावरुन काही तरुणांसोबत वाईन शॉपचे व्यवस्थापक माधव वाकोरेचा वाद झाला. त्यानंतर थोड्यावेळाने पुन्हा तरुणांचे टोळके वाईन शॉपवर आले आणि वाकोरे यांना मारहाण करत धारदार शस्त्राने वार केले.
तरुणांच्या हल्ल्यात जखमी वाकोरे यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात मारेकरांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत मारेकऱ्यां च्या तपासात पथके रवाना केली आहेत. वाईन शॉप हा खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या जवळच्या नातेवाईकाचा आहे. त्यामध्ये एकूण सहा आरोपी असून तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित तीन आरोपींचा शोध सुरु आहे.
Web Title: Murder Wine shop manager stabbed to death with a sharp weapon