Home अहमदनगर अहमदनगर पुणे महामार्गावर थरकाप उडवणारी घटना, अक्षरशः ठिणग्या उडाल्या

अहमदनगर पुणे महामार्गावर थरकाप उडवणारी घटना, अक्षरशः ठिणग्या उडाल्या

Accident: शिक्रापूर जवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला.

accident involving a car and a container took place near Shikrapur

पुणे: अहमदनगर महामार्गावर शिक्रापूर जवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. शिक्रापूर परिसरात  हा अपघात झाला आहे. कंटेनर आणि कारचा भीषण हा अपघात एवढा भयानक होता की कंटेनरने कारला अक्षरश: फरफटत नेले त्यावेळी ठिणग्या बाहेर पडत होत्या.

याबाबत अधिक माहिती अशी की,  कारला ज्या कंटेनरला फरफटत नेले होते त्या कारमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते. मात्र, सुदैवाने त्या प्रवास करणाऱ्या चार प्रवाश्यांना कुठलीही दुखापत झाली नाही. त्यांनी समोर साक्षात मृत्यू पाहिल्याचा अनुभव आला असल्याचे बोलले जात आहे.

या अपघाताचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिला तरी अंगावर शहारे उभे राहतात अशी ही अपघाताची घटना आहे. हा अपघात इतका भीषण होता की समोर पाहणाऱ्या आणि अपघाताचा व्हिडीओ पाहणाऱ्या सगळ्यांची काळजाची धड धड वाढेल. कंटेनर कारला फरफटत नेत असताना अक्षरशः ठिणग्या उडत असल्याचे देखील व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे.

या भीषण अपघातातून दैव बलवत्तर म्हणून चारही प्रवासी अगदी थोडक्यात बचावले आहेत. कारमधील एकालाही कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघातामुळे काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, याचा प्रत्यय कारमधील चारही प्रवाशांना आला आहे. मात्र, भीषण अपघातातून दैव बलवत्तर म्हणून चारही प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.

Web Title: accident involving a car and a container took place near Shikrapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here