Home क्राईम प्रेमविवाहनंतर तरुणी घरी आली अन मामाच्या मदतीने केला तिच्या भावाचा खून

प्रेमविवाहनंतर तरुणी घरी आली अन मामाच्या मदतीने केला तिच्या भावाचा खून

Nashik Murder Case: प्रियकराने मामाच्या मदतीने तरुणीच्या भावाचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार.

love marriage, the young woman came home and murder her brother with the help of her uncle

नाशिक : प्रेमविवाह केलेली तरुणी घरी आली नाही, म्हणून प्रियकराने मामाच्या मदतीने तरुणीच्या भावाचा खुन (Murder)bकेल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या मायको दवाखाना फुलेनगर परिसर येथे समोर आला आहे. रात्री उशिरापर्यंत पंचवटी पोलिस ठाण्यात या खुनाबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. या घटनेने खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवी सय्यद या तरुणाच्या बहिणीसोबत संशयित विशाल ताराळकर याचे प्रेमसंबध आहेत. तरुणी काही दिवसांपासून तिच्या घरी असल्याने संशयिताने तिला फोन करत घरी ये नाही तर तुझ्या भावाचा गेम करेल अशी धमकी दिली होती. त्यांनतर संशयित विशाल ताराळकर, किरण कोकाटे या दोघांनी रवी सय्यद याच्यावर हल्ला केला. यात रवीचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात खून झालेल्या रविचा मृतदेह आणला असता नातेवाईकांनी गर्दी केल्याने तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून खुनातील दोघा संशयित आरोपींना अटक (Arrested) केली असून पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेबाबत अधिक तपास सुरु आहे.

Web Title: love marriage, the young woman came home and murder her brother with the help of her uncle

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here