Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: बस व ट्रकचा भीषण अपघात, १५ जण जखमी

अहमदनगर ब्रेकिंग: बस व ट्रकचा भीषण अपघात, १५ जण जखमी

Breaking News | Ahmednagar Accident: लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना.

accident involving bus and truck, 15 injured

अहमदनगर: अहमदनगर पुणे महामार्गावरील म्हसणे फाटा येथे लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. यामधील वाहनचालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.

गुरुवारी रात्री १२ च्या सुमारास अहमदनगर पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील म्हसणे फाटा येथील कैलास गाडीलकर यांच्या पेट्रोल पंपासमोर ट्रक (एम एच -१६ सीडी ९५५०) महामार्ग ओलांडून पुण्याच्या दिशेने जात असताना त्याच वेळी पुण्याच्या दिशेकडून अहमदनगरच्या दिशेने जात असलेली चिंतामणी ट्रॅव्हल कंपनीची खासगी बस (क्रमांक एम एच २९ बीई ००९९) ही बस त्या ट्रकवर जोरात आदळली. या अपघातात बस चालकासह १५ प्रवासी जखमी झाले आहेत. यात बसचालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. इतर जखमींना सुपा, अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अरुण आव्हाड फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते.

त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करत महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. यावेळी पीआय आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार इगळे, रमेश शिंदे, रुग्णवाहिका चालक सादिकभाई यांनी सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले व महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

Web Title: accident involving bus and truck, 15 injured

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here