अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा
Breaking News | Buldhana Crime: अल्पवयीन मुलीला डांबून तिच्यावर अमानुष शारीरिक अत्याचार (abused) केल्याची घटना समोर आली आहे.
बुलढाणा : शहरातील एका अल्पवयीन मुलीला डांबून तिच्यावर अमानुष शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामध्ये पीडितेच्या मैत्रीणीसह तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे प्रशासकीय व पोलीस विभागाचे मुख्यालय असलेले बुलढाणा शहर हादरले आहे.
पीडिता १५ वर्षांची असून खामगाव मार्गावरील सुंदरखेड स्थित तार कॉलनी, येथील सत्यम शिवम अपार्टमेंटच्या बाजूला असलेल्या घरात १७ ते २८ फेब्रुवारी दरम्यान डांबून ठेवून तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले. मात्र याची तक्रार २९ रोजी उशिरा देण्यात आली.
घटनेच्या दिवशी १६ फेब्रुवारीला पीडिता सायंकाळी दूध आणण्यासाठी गेली होती. ती घरी आलीच नाही. अशिक्षित असल्याने मी तक्रार केली नसल्याचे आईने सांगितले. पीडिता २८ ला संध्याकाळी घरी आल्यानंतर तिने आईला तिच्यावरील अत्याचाराची माहिती दिली. दूध आणण्यासाठी जात असताना चिखली मार्गावर गोलांडे लॉन जवळ आरोपी हशिर आणि पूजा जाधव हिने आवाज दिला. पूजाने घरी सोडण्याची बतावणी करीत पीडितेला घटनास्थळी नेले. आरोपी दीपक गवई याने १७ ते २८ फेब्रुवारी दरम्यान बळजबरीने शारीरिक संबंध ठेवल्याचे मुलीने सांगितले.
याबाबत पीडितेच्या आईने तक्रार दाखल केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या सूचनेवरून शहर पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने तपास चक्रे फिरवित तिघा आरोपींना जेरबंद केले. हशिर (अपूर्ण नाव, रा. बुलढाणा) पूजा जाधव( रा. चिखली ) व दीपक गवई (रा. विजय नगर बुलढाणा ) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरुद्ध कलम ३७६, ,३७६ (२) (एन), ३४४, ३२३, ५०६, ३४ भादवी सह कलम ४, ५ (एल), ६, ८,१२ बालकाचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२, तसेच कलम ३(१) (डब्ल्यू), ३(१)(आर), ३(२) (व्हीए) अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अधिनियम १९८९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: A minor girl was abused for 10 days
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study