Home नाशिक नाशिक: प्रियकराचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करीत बदनामी

नाशिक: प्रियकराचे मॉर्फ केलेले फोटो व्हायरल करीत बदनामी

Breaking News | Nashik Crime: प्रेयसीने आपल्या प्रियकराचे व त्याच्या कुटुंबीयांनी सदस्यांचे फोटो मॉर्फ केले आणि ते प्रियकराच्या नातेवाइकांमध्ये आणि सोशल मीडियावर व्हायरल करीत त्यांची बदनामी. (morphed photos)

Defamation by making morphed photos of boyfriend viral

नाशिक : प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतरही संशयित प्रेयसीने आपल्या प्रियकराचे व त्याच्या कुटुंबीयांनी सदस्यांचे फोटो मॉर्फ केले आणि ते प्रियकराच्या नातेवाइकांमध्ये आणि सोशल मीडियावर व्हायरल करीत त्यांची बदनामी केल्याची घटना समोर आली आहे.  याप्रकरणी नाशिक सायबर पोलिसांत संशयित प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल झाला.

प्रियकराच्या ६५ वर्षीय वडिलांच्या फिर्यादीनुसार त्यांच्या मुलाचे संशयित मुलीशी प्रेमसंबंध होते. परंतु ते संपुष्टात आले. त्यानंतर संशयित प्रेयसीने प्रियकराचे व त्याच्याच कुटुंबातील मुलीचे फोटो मॉर्फ करून ते व्हायरल केले. तिच्या या कृत्यामुळे मुलाचे लग्न दोनदा मोडल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

पीडित प्रियकर आणि मुलगी एकमेकांच्या ओळखीतील असून, ते पंचवटीतील घराजवळच राहतात. मुलगा परराज्यात नोकरीला असून, ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन २०२१ पासून ते एकमेकांच्या प्रेमात होते. नंतर त्यांचे प्रेमसंबंध संपुष्टात आले होते. प्रेमसंबंध तुटल्याचा राग मनात धरून प्रेयसीने बनावट मेल आयडीद्वारे मुलाचे व्हॉट्सअप व फेसबुक प्रोफाइल बनविले.

मुलीच्या नावे बनावट इन्स्टाग्राम अकाउंट बनवून त्याद्वारे प्रोफाइलवर चॅटिंग व विविध स्टेट्सद्वारे प्रियकराच्या बहिणीचा व इतर नातेवाइकांचा एका कार्यक्रमातील मूळ फोटोचा वापर करून अश्लिल फोटोशी मॉर्फ करून तो इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. यामुळे बदनामी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, सहायक निरीक्षक कोरबू तपास करीत आहेत.

Web Title: Defamation by making morphed photos of boyfriend viral

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here