संगमनेर तालुका पोलिसांनी पकडला वाळूचा ट्रॅक्टर
Breaking News | Sangamner: कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील कोकणेवाडी शिवारात वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडला. (seized)
संगमनेर: वाळूतस्करी रोखण्यासाठी संगमनेर तालुका पोलीस चांगलेच सतर्क झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. १ मार्च रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील कोकणेवाडी शिवारात वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडला आहे.
याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की तालुका पोलिसांचे पथक रात्र गस्तीवर असताना कोकणेवाडी शिवारात ट्रॅक्टर (क्र. एमएच. ३८, बी.४६७७) अवैधरित्या वाळू वाहतूक करताना मिळून आला. पोलिसांनी दहा हजार रुपयांची एक ब्रास वाळू, ५५ हजार रुपयांची ट्रॉली आणि १ लाख ५० हजार रुपयांचा ट्रॅक्टर असा एकूण २ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोकॉ. बाबासाहेब शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टर चालक-मालक ऋषिकेश दिगंबर देशमुख (रा. सुगाव) याच्यावर गुरनं. ११९/२०२४ भादंवि कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. आर. ए. लांघे हे करत आहे.
Web Title: Sand tractor seized by Sangamner taluka police
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study