अहमदनगर: अजय महाराज बारस्करांना जीवे मारण्याची धमकी
Breaking News | Ahmednagar: अजय महाराज बारस्कर घरी आले तर त्यांना जीवे ठार मारू, अशी धमकी दिली असल्याची घटना, कुटुंबाला केली शिवीगाळ; पाच जणांविरोधात गुन्हा.
अहमदनगर: मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी गंभीर आरोप करणारे अजय महाराज बारस्कर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला शिवीगाळ केली. तसेच अजय महाराज बारस्कर घरी आले तर त्यांना जीवे ठार मारू, अशी धमकी दिली असल्याची घटना गुरूवारी (दि. २९) दुपारी साडेतीनच्या सुमारास एमआयडीसीतील जिमखाना परिसरात घडली.
याप्रकरणी सायंकाळी किरण साहेबराव बारस्कर (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल शिवाजी घोलप (रा. घोलप वस्ती, निंबळक ता. नगर), स्वप्नील चव्हाण, करण मापारी, अक्षय व सुरज शेवाळ (पूर्ण नावे माहिती नाही, सर्व रा. नगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणासाठी लढा देणारे जरांगे पाटील यांच्याविषयी मागील पंधरा दिवसांपासून अजय महाराज बारस्कर यांनी मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून गंभीर आरोप केले आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या वक्तव्याचा नगरमधील सकल मराठा समाजासह त्यांच्या सावेडी ग्रामस्थांनी निषेध केला आहे. त्यांच्या वक्तव्याशी आमचा संबंध नसल्याचेही ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेतून स्पष्ट केले आहे.
दरम्यान गुरूवारी दुपारी किरण बारस्कर हे त्याच्या घरी झोपलेले असताना त्यांना आरडाओरडा करण्याचा व शिवीगाळ केल्याचा आवाज आला. तेव्हा त्यांनी घराच्या खिडकीजवळ जाऊन पाहिले असता विशाल घोलपसह पाच जणांनी अजय महाराज व कुटुंबाला शिवीगाळ केली. अजय महाराज घरी आले तर त्यांना जीवंत ठार मारू, अशी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर किरण बारस्कर यांनी एमआयडीसी पोलिसांना माहिती देत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार चौधरी करीत आहेत.
Web Title: Death threat to Ajay Maharaj Barskar
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study