अहमदनगर: पोलीस हवालदार २ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडला
Breaking News | Ahmednagar: पोलीस हवालदार यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपये लाचेची मागणी केली. ही लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले.
राहाता: ६ आसनी प्रवासी रिक्षा पोलीस हवालदार सुधाकर काळोखे याने अडवून राहाता पोलीस ठाण्यात लावली होती. सदरची गाडी सोडून देण्यासाठी आरोपी पोलीस हवालदार काळोखे यांनी तक्रारदाराकडे २ हजार रुपये लाचेची मागणी केली. ही लाच स्विकारताना लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला रंगेहाथ पकडले.
शिर्डी शहरातील भिमनगर येथील तक्रारदाराची सहा आसनी प्रवासी वाहतूक अॅपे रिक्षा एक फेब्रुवारी २०२४ रोजी पोलीस हवालदार सुधाकर काळोखे यांनी सदरची गाडी अडवून पोलीस स्टेशनमध्ये लावली. सदरची गाडी सोडण्यासाठी आरोपी काळोखे हे तक्रारदार यांच्याकडे २ हजार रुपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगरकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार पंचांसमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली. पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक काळोखे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे २ हजार रुपये लाचेची मागणी करुन ती लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपी काळोखे यास ताब्यात घेऊन २९ फेब्रुवारी रोजी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
यावेळी लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक राजू अल्हाट यांनी सापळा लावून आरोपीला जेरबंद केले. या पथकात महिला पोलीस राधा खेमनर, पो. ना. किशोर लाड, पोलीस अंमलदार बाबासाहेब कराड आणि चालक हवालदार दशरथ लाड आदींचा समावेश होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे व उपअधीक्षक प्रविण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Web Title: police constable was caught red-handed while accepting a bribe of Rs
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study