Home Accident News खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चार ठार, प्रवासी गाढ झोपेत...

खासगी ट्रॅव्हल बस आणि ट्रकचा भीषण अपघात, चार ठार, प्रवासी गाढ झोपेत असतानाच….

Accident: कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बस आणि साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली असून या अपघातात चार प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू, 22 जण गंभीर जखमी.

accident involving private travel bus and truck, four killed

कोल्हापूर: कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या एका खासगी ट्रॅव्हल बस आणि साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मध्यरात्री भीषण अपघात झाल्याची घटना घडली असून या अपघातात चार प्रवाशांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता की, अपघातात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तर चार जणांचे मृतदेहही ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहुन मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसचा आणि साखर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. रात्री 2:15 च्या सुमारास हा अपघात झाला आहे. सर्व प्रवासी गाढ झोपेत असतानाच हा अपघात झाला. पुण्यातील पुणे-बेंगलोर महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात 22 जण जखमी झाल्याची माहिती आहे. तर यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. या अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस, वाहतूक विभाग, PMRD अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅव्हल्समध्ये एकूण 21 प्रवासी, 1 ड्राइवर आणि एक क्लिनर असे एकूण 23 जण होते. साखरेच्या ट्रकमध्ये एक ड्राइवर, 2 मालक असे एकूण 3 जण होते. त्यापैकी ससून हॉस्पिटल येथे 05, चव्हाण हॉस्पिटल येथे 09 व नवले हॉस्पिटल येथे 06, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे 02 असे एकूण 22 जण उपचार घेत आहेत.

दरम्यान, अपघात झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तसेच स्थानिक नागरिकांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. मात्र रात्रीचा अंधारप असल्याने मदतकार्यात अडथळा येत होता. अपघातातील इतर प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

Web Title: accident involving private travel bus and truck, four killed

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here