Home क्राईम शेतकरी म्हशीला घेऊन घराबाहेर पडला, मनात वेगळंच चक्र सुरू होतं; शेतात गेल्यावर...

शेतकरी म्हशीला घेऊन घराबाहेर पडला, मनात वेगळंच चक्र सुरू होतं; शेतात गेल्यावर कुटुंब हादरलं

एका शेतकऱ्याने कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्येचं (Suicide) टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना.

a farmer taking the extreme step of suicide under the burden of debt

परभणी : शेतकऱ्याच्या आत्महत्या करण्याचे सत्र काही थांबेनसे झाले आहे. परभणीत एका शेतकऱ्याने कर्जाच्या ओझ्याखाली आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बँकेचं असलेलं कर्ज कसं फेडावं या विचारात असतानाच शेतकरी शेतामध्ये म्हैस चरण्यासाठी घेऊन गेला होता. मात्र त्यावेळी त्यांनी म्हशीच्या गळ्यातील कासरा सोडून लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना परभणीच्या पाथरी तालुक्यातील लिंबा येथे घडली आहे.

४५ वर्षीय बाळासाहेब काशिनाथ दळवी असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

परभणीच्या पाथरी तालुक्यातील लिंबा येथे राहणाऱ्या बाळासाहेब किसन दळवी हे अल्पभूधारक शेतकरी होते. त्यांचं दोन एकर शेत आहे. शेतामध्ये उत्पन्न कमी मिळत असल्याने त्यांनी भारतीय स्टेट बँकेच्या शाखेकडून कर्ज घेतलं होतं. बाळासाहेब दळवी मागील काही दिवसापासून अस्मानी आणि सुलतानी संकटाचा सामना करताना शेतातील पिक हातातून गेल्यामुळे बँकेचं कर्ज कसं फेडावं या विवंचनेमध्ये त्यांनी आत्महत्या केली आहे.

Web Title: a farmer taking the extreme step of suicide under the burden of debt

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here