Home अहमदनगर अहमदनगर: रिक्षा चालकाने केला मुलीचा विनयभंग

अहमदनगर: रिक्षा चालकाने केला मुलीचा विनयभंग

Ahmednagar News: ती फिश टँक पाहत असताना एका ११ वर्षीय मुलीचा रिक्षा चालकाने विनयभंग (Molested) केल्याचा धक्कादायक प्रकार पीडितेसोबत गैरकृत्य केले.

The rickshaw driver molested the girl

अहमदनगर: नवीन फिश टँक दाखवितो असा बहाणा करून एका ११ वर्षीय मुलीचा रिक्षा चालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना शुक्रवारी (दि. २१) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभय निळकंठ सात्राळकर असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे. पीडिता ही रात्रीच्यावेळी बाहेर सायकल खेळत होती. त्यावेळी तिथे सात्राळकर आला. त्याने तुला नवीन फिश टैंक दाखवितो. असे म्हणून पीडितेला घरात नेले. ती फिश टँक पाहत असताना आरोपीने पीडितेसोबत गैरकृत्य केले. त्यामुळे पीडित मुलगी घाबरून मोठ्याने ओरडू लागली. तेथून ती पळत आईकडे गेली व आईला घडलेला प्रकार सांगितला. आईने ही बाब पीडितेच्या वडिलांना सांगितली. वडिलांनी कॉलनीतील काही लोकांना बोलावून घेतले. त्यानंतर पीडितेच्या आईने तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. पुढील तपास पोलिसा उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत.

Web Title: The rickshaw driver molested the girl

See Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here