Home Accident News अहमदनगर ब्रेकिंग: ट्रक व दोन दुचाकींचा भीषण अपघात, बाप लेकासह नातवाचा मृत्यू...

अहमदनगर ब्रेकिंग: ट्रक व दोन दुचाकींचा भीषण अपघात, बाप लेकासह नातवाचा मृत्यू  

Ahmednagar Accident:  नगर मनमाड महामार्गावर भीषण अपघात, ट्रक व दोन दुचाकींच्या अपघातात तिघांचा मृत्यू (Death). दोन्ही दुचाकीचा ट्रक खाली चक्काचूर.

accident involving truck and two bikes, death of father and daughter

राहुरी: राहुरी येथील नगर- मनमाड महामार्गावर जोगेश्वरी आखाडा परिसरात ट्रक व दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला असून या अपघातात बाप-लेकासह नातवाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे.

या अपघातात पाथर्डी तालुक्यातील तीसगाव जवळील मोहज येथील प्रकाश मोहन ठोकळ (वय 65), शुभम प्रकाश ठोकळ ( वय 25), सायरस प्रविण जाधव (वय 5) या तिघांचा समावेश आहे. हे सर्वजण वेगवेगळ्या दोन दुचाकीवरून शिर्डीकडे नातवाला शाळेतील वस्तीगृहात पोहोच करण्यासाठी जात असतांना राहुरी  येथील जोगेश्वरी आखाडा परिसरात शिर्डीच्या दिशेने सिमेंट घेऊन जाणार्‍या ट्रकला (एमएच 16 सीडी 2066) धक्का लागल्याने दोन्ही दुचाक्या ट्रक खाली आल्याने सुमारे 50 ते 60 फुटांपर्यत त्यांना ट्रकने फरफटत नेले.

या अपघातात दोन्ही दुचाकीचा ट्रक खाली चक्काचूर झाला आहे. महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू असल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

Web Title: accident involving truck and two bikes, death of father and daughter

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here