Home जळगाव मुलगा झोका खेळताना अचानक गळफास लागल्याने जागीच मृत्यू

मुलगा झोका खेळताना अचानक गळफास लागल्याने जागीच मृत्यू

झोक्यावर अभ्यास करीत असताना अचानक गळफास लागून मुलाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना.

Boy died on the spot due to sudden strangulation

जळगाव: अमळनेर शहरातील मुंदडानगरातील एका १४ वर्षीय मुलाचा झोका खेळताना अचानक गळफास लागल्याने जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना रविवारी (ता. २०) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास मुंदडानगरात घडली. या घटनेने सर्वत्र व्यक्त होत आहे.

वेदांत संदीप पाटील, असे मयत बालकाचे नाव आहे. रविवारी तो घरी वरच्या मजल्यावर झोक्यावर बसून अभ्यास करत असताना झोक्याच्या दोरीचा गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती आई- वडिलांना समजताच त्यांनी हंबरडा फोडला. हा विद्यार्थी मुंदडा ग्लोबल स्कूलचा नववीचा विद्यार्थी असून, त्याचे आई- वडिल दोन्ही शिक्षक आहेत. एस. आर. पाटील यांचा तो मुलगा आहे.

इयत्ता 8 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी तसेच सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरीता अतिशय उपयुक्त असे इंग्रजी व्याकरण अभ्यासण्यासाठी आवश्यक असे मोफत स्टडी मटेरीअल….  

काही महिन्यांपूर्वी कोण बनणार करोडपती, या कार्यक्रमात सहभागी झालेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका जयश्री पाटील यांचा मुलगा होता. त्याचा मृतदेह अमळनेर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Boy died on the spot due to sudden strangulation

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here