Home संगमनेर संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार, एक जखमी- Accident

संगमनेर: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार, एक जखमी- Accident

Accident killed on a two-wheeler in an unidentified vehicle collision

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील बोटा परीसरातील महावितरण सब स्टेशन जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना रविवार दिनांक २२ मे रोजी सकाळी ११.३० ते १२ वाजेच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  भरत पाराजी शेलार व शंकर धोंडीराम चिकणे रा. गांधीनगर येरवडा पुणे हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी क्रमांक एम एच १२ एल क्यू २७०३ हीच्या वरून नाशिकच्या दिशेने चालले होते ते रविवारी सकाळी बोटा परीसरातील सब स्टेशन जवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या वाहणाने जोराची धडक दिली यात शंकर धोंडीराम चिकणे हे जागीच ठार झाले तर भाऊराव पाराजी जाधव हे जखमी झाले तर त्यांना रूग्णवाहीकेद्वारे आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, योगीराज सोनवणे, सुनिल साळवे नंदकुमार बर्डे,घारगांव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र लांघे, प्रमोद चव्हाण, नामदेव बिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Web Title: Accident killed on a two-wheeler in an unidentified vehicle collision

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here