Home Accident News Accident: पिकअप व दुचाकीच्या सामोरासमोर अपघातात दोन जण ठार

Accident: पिकअप व दुचाकीच्या सामोरासमोर अपघातात दोन जण ठार

Accident kopargaon bike and pikup two death

कोपरगाव | Accident: शहरालगत पुणतांबा फाटा चौफुली नगर मनमाड रस्त्यावर पिकअप व दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात झाल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरवारी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास घडली.

सतीश बाबासाहेब वाघ रा.निघोज ता. राहता व संजय सावित्रा गांजवे रा. स्वामी समर्थ नगर ता. संगमनेर या दोघांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

सतीश बाबासाहेब वाघ व संजय सावित्रा गांजवे हे दोघे जण दुचाकीवरून श्री संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोकमठाणकडून निघोजकडे जात होते. पुणतांबा फाटा येथे पिकअप ची मोटारसायकलला समोरून धडक बसली. यात दोघांचा मृत्यू झाला.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर 

याप्रकरणी बाळासाहेब गांजवे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली असून फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक बी. सी.  नागरे हे करीत आहेत.

Web Title: Accident kopargaon bike and pikup two death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here