Home Suicide News पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar News Suicide by strangulation of a police 

अहमदनगर | Ahmednagar News: जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच ते साडे पाच दरम्यान नगर शहरातील दातरंगे मळा येथे घडली.

समाधान अच्युतराव भुतेकर वय २१ असे या आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो

खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पोलीस कॉन्स्टेबल समाधान भुतेकर हे नगर शहर वाहतूक शाखेत कार्यरत होते. त्यांची नुकतीच कोतवाली पोलीस ठाण्यात बदली झाली होती. त्यामुळे त्यांना शहर वाहतूक शाखेतून कार्यमुक्त करण्यात आले होते. परंतु भुतेकर हे कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले नव्हते. ते दातरंगेमळा येथे कुटुंबांसोबत राहत होते. गुरुवारी सायंकाळी त्यांची पत्नी मुलीसोबत मंदिरात गेली होती. त्याचवेळी समाधान यांनी घरात गळफास घेतला. त्यांनी आत्महत्या का केली याबाबत कारण अद्याप समोर आले नाही. अधिक तपास निरीक्षक भान्सी हे करीत आहे.   

Web Title: Ahmednagar News Suicide by strangulation of a police 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here