Accident: संगमनेर तालुक्यात कंटेनरने कट मारल्याने टेम्पोचा अपघात
संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे संगमनेर कोपरगाव रस्त्यावर करुले शिवारात समोरून येणाऱ्या कंटेनरने कट मारल्याने महिंद्रा टेम्पो उलटल्याची घटना घडली आहे. या अपघातात चालकासह दोघे जण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात गुरुवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घडला.
या अपघातात टेम्पोतील सचिन चौधरी वय ३० व रामनाथ जगन्नाथ मोराणकर रा. धुळे हे दोघे जखमी झाले आहे.
येथे पहा: बेस्ट कॉमेडी जोक व्हिडियो
खरेदी करा: आपल्यासाठी खास अमेझॉन ऑफर
संगमनेर ते कोपरगाव रस्त्याने कोपरगावच्या दिशेने महिंद्रा टेम्पो (एम.एच. १८ एए. ६२२५) जात होता. धुळे येथे जात असलेल्या महिंद्रा टेम्पोला करुले शिवारात समोरून आलेल्या कंटेनरने कट कारल्याने टेम्पो डांबरी रस्त्यावर उलटून अपघात घडला. यामध्ये दोघे जण जखमी झाले असून टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी अपघात स्थळी मदतकार्य केले. जखमींना तातडीने संगमनेर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी अर्ध्या डांबरीवर उलटलेला टेम्पो बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. कंटेनरचालक हा पसार झाला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे.
Web Title: Sangamner karule area tempo Accident two injured