Home Accident News संगमनेर थोरात साखर कारखान्याची रुग्णवाहिका व एसटी बसचा अपघात- Accident

संगमनेर थोरात साखर कारखान्याची रुग्णवाहिका व एसटी बसचा अपघात- Accident

Accident of ambulance and ST bus of Sangamner Thorat sugar factory

Sangamner | संगमनेर: संगमनेर महाविद्यालयाजवळ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याची रुग्णवाहिका व बसचा अपघात (Accident) झाला असून यामध्ये रुग्णवाहिकेचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही धडक झाली आहे. यामध्ये रुग्णवाहिका चालक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची रुग्णवाहिका (क्रमांक एम. एच. 17 बी. डी. 2692) ही साखर कारखान्याकडे जात होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संगमनेर महाविद्यालय जवळील अकोले बायपास च्या कडेला या रुग्णवाहिकेचा अपघात झाला. सासवड आगाराची बस (क्रमांक एम. एच. 14 टी. 4197)  या रुग्णवाहिकेची समोरासमोर धडक झाली.

या अपघातात रुग्णवाहिकेचे व बसचे नुकसान झाले. रुग्णवाहिका चालक जखमी झाला. याबाबतची माहिती शहर पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. जखमी चालकास खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.

Web Title: Accident of ambulance and ST bus of Sangamner Thorat sugar factory

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here