Home अहमदनगर अहमदनगर: सहायक पोलीस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर: सहायक पोलीस निरीक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

Ahmednagar Assistant Police Inspector attempted suicide

Ahmednagar | अहमदनगर: एका सहायक पोलीस निरीक्षकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. कौटुंबिक कारणातून हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. पिंपळगाव माळवी ता. नगर येथील तलावाजवळ ही घटना घडली असून त्यांच्यावर अहमदनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यात नियुक्ती असलेले व सध्या येथील मुख्यालयात प्रतिनियुक्तीवर असलेले सहायक पोलीस निरीक्षक अहमदनगर शहरातील सावेडी उपनगरात राहतात. शनिवारी त्यांच्या कुटुंबात वाद झाले. या कारणातून त्यांनी पिंपळगाव माळवी येथील तलावाजवळ जात विषारी औषधाचे सेवन केले. त्यावेळी त्यांच्यासोबत कोणी नव्हते. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. स्थानिक नागरिकांनीच सहायक निरीक्षक यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रात्री रूग्णालयात त्यांच्या सहकार्‍यांनी मोठी गर्दी केली होती. एमआयडीसी पोलिसांनी रूग्णालयास भेट दिली.

Web Title: Ahmednagar Assistant Police Inspector attempted suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here