Home पुणे Rape | पहिल्या लग्नाची माहिती लपवून दुसरीला लग्नाचे आमिष देऊन बलात्कार

Rape | पहिल्या लग्नाची माहिती लपवून दुसरीला लग्नाचे आमिष देऊन बलात्कार

Rape by hiding the information of the first marriage

Pune Crime | पुणे: पहिल्या लग्नाची माहिती लपवून ठेवून, लग्न झालेले असताना, एका २८ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची घटना घडली आहे. याबाबत पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तरुणीने फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याचा जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तरुणी ही पुण्यातील तर आरोपी मध्यप्रदेशाचा रहिवासी आहे.

सौगभसिंह भदोरीया असे या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी आणि फिर्यादी तरुणीची ओळख इंस्टाग्रामवरुन झाली होती. या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपीचा आधीच एक विवाह झाला असताना देखील तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर अनेक दिवस दोघे सोबत राहिले. तरुणीच्या घरी देखील आरोपीची कायम ये-जा असायची शिवाय घरी,  गोवा, मुंबईत देखील दोघे फिरायला गेले असता तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याचं तरुणीने सांगितलं आहे. तरुणीवर जबरदस्ती करुन तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. विवाह न करता तरुणीची फसवणुक केली, असं तक्रारीत म्हंटले आहे. लग्न करणार असे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला.

याबाबत सौगभसिंह भदोरीया विरोधात तरुणीने पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. नंतर आरोपीला अटक देखील करण्यात आली होती. तरुणीची फसवणूक करुन शारीरिक संबंध ठेवले त्यामुळे कोर्टाने आरोपीचा जामीन फेटाळला आहे.

Web Title: Rape by hiding the information of the first marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here