Accident: संगमनेर तालुक्यात दोन दुचाकीत समोरासमोर भीषण अपघात, एक जण ठार
संगमनेर | Accident: संगमनेरहून तळेगाव दिघे गावच्या दिशेने संगमनेर कोपरगव रस्त्याने दोन दुचाकीत समोरासमोर भीषण अपघात अपघात घडल्याची घटना बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास घडली.
संगमनेर कोपरगाव रस्त्याने संगमनेरकडून तळेगाव दिघे गावाच्या दिशेने दिलीप निवृत्ती दिघे हे दुचाकीवरून जात असताना दरम्यान बबन सिताराम दिघे हे संगमनेरच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. बुधवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास तळेगाव दिघे शिवारातील जुन्या खडी क्रशरजवळ दोन्ही दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात जबर मार लागल्याने बबन सिताराम दिघे हे जागीच ठार झाले, तर दिलीप निवृत्ती दिघे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांना संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, या अपघाताची माहिती समजताच पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी घटनास्थळी भेट दिली. मयत दिघे यांचा मृतदेह घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला. पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे.
Web Title: Accident Of Bike in Sangamner one Death