Home अकोले अकोले तालुक्यात आढळा भागातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोव्हिड सेंटर सुरु करावे

अकोले तालुक्यात आढळा भागातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोव्हिड सेंटर सुरु करावे

Akole Devthan Ganore Start Covid Center 

अकोले तालुक्यात आढळा भागातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोव्हिड सेंटर सुरु करावे: अंकुश वाकचौरे 

अकोले:  अकोले तालुक्यातील आढळा परीसरातील गणोरे, देवठाण,विरगाव,हिवरगाव,पिपंळगाव,डोंगरगाव भागातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी या भागांत कोव्हिड सेंटर सुरु अशी मागणी नागरिक व रुग्णांचे नातेवाईक यांच्यातून होत आहे.

अकोले तालुक्याच्या आढळा भागामध्ये कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. उपचारासाठी तालुक्याच्या बाहेर रुग्णाला घेऊन जावे लागते.  यामुळे कोरोनाबाधित रूग्णाची व त्यांच्या नातेवाईकांचे मोठी हेळसांड होत असून, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिवसेंदिवस रूग्ण सापडत आहेत. या रुग्णांसाठी अकोले तालुक्यातील इतर कोव्हिड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. दररोजची रूग्णसंख्या पाहता इतर केंद्र पुर्ण भरले आहे. अशा परिस्थितीत या कोरोना महामारीच्या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी गणोरे किंवा देवठाण इतर कोणत्याही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी लोकप्रतिनिधी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी पुढाकार घेऊन तातडीने कोव्हिड सेंटर सुरू करावे अशी मागणी युवानेते अंकुश वाकचौरे यांनी केली आहे.

Web Title: Akole Devthan Ganore Start Covid Center 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here