Home अहमदनगर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडसाठी आंदोलकांनी रात्र काढली आयुक्तांच्या दालनासमोरच

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडसाठी आंदोलकांनी रात्र काढली आयुक्तांच्या दालनासमोरच

Ahmednagar Protesters spent the night in front of the commissioner's office

अहमदनगर | Ahmednagar : नगर शहरात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड तसेच शहरात महापालिकेने जम्बो कोविड सेंटर उभे करावे या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी शहर कॉंग्रेसतर्फे गुरुवार पासून महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन सुरु करण्यात आले असून गुरुवारी दिवसभरात सकारात्मक चर्चा न झाल्याने आंदोलकांनी रात्र आयुक्तांच्या दालना समोरच काढली.

त्यांनी मुक्काम तेथेच ठोकला योग्य तोडगा निघाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची माहिती कॉंग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे. आंदोलन सुरु झाल्यापासून मनपा आयुक्त कार्यालयाकडे फिरकले नाही. अन्य अधिकाऱ्यांनी चर्चा केली मात्र काही निष्पळ झाले नाही.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जम्बो कोविड सेंटर उभारण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या होत्या मात्र महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. जोपर्यंत आयुक्त येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असा पवित्रा आंदोलकांनी दिला आहे. महापालिकेचे उपायुक्त यशवंत डांगे आणि तोफखाना पोलीस निरीक्षक सुरेश गायकवाड यांच्यासह पोलीस अधिकारी आंदोलन मागे घेण्यासाठी किरण काळे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र मागणी मान्य झाल्याशिवाय मनपा सोडणार नाही अशी परखड भूमिका घेतली आहे.

Web Title: Ahmednagar Protesters spent the night in front of the commissioner’s office

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here