Home महाराष्ट्र Chhota Rajan dies: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू

Chhota Rajan dies: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू

Chhota Rajan dies Corona 

दिल्ली | Chhota Rajan dies: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोनाची लागण झालेली होती . 27 एप्रिलला उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल केले होते. तेथेच त्याने घेतला अखेरचा श्वास. छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना करोनाची लागण झाली होती. २७ एप्रिलला दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला आहे.

तब्बल २६ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी छोटा राजांसह तीन जणांना दोन वर्षाची शिक्षा सुनाविण्यात आली होती.

छोटा राजन ऊर्फ नाना, याचं खरं नाव राजन सदाशिव निकाळजे असं आहे. तो सुरुवातीला अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्ब हल्ल्याचा आरोपी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार होता. मात्र, नंतर दोघांत शत्रूत्व निर्माण झालं.

छोटा राजन विरोधात 17 हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. तो कित्येक वर्षांपासून फरार होता. मात्र, 2015 साली इंडोनेशियातून त्याला अटक करण्यात आली.

Web Title: Chhota Rajan dies Corona 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here