Home संगमनेर नैराश्येतून विखे पाटलांचे बोलणं येत असत, त्यांच्या बोलण्याला महत्व देऊ नका: मंत्री...

नैराश्येतून विखे पाटलांचे बोलणं येत असत, त्यांच्या बोलण्याला महत्व देऊ नका: मंत्री थोरात

Don't pay attention to what say vikhe Balasaheb Thorat

संगमनेर: संगमनेरमध्ये पोलीस कर्मचारी कर्तव्य पार पाडत असताना त्यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली ती अत्यंत चुकीची आहे. चुकीच्या वागणाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे, मग तो कोणी का असेना. त्या पद्धतीने पोलिसांनी काम करावे असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले.

संगमनेरच्या लोकप्रतिनिधींचा त्यांच्या मतदार संघात संपर्क राहिला नसल्याचे राधाकृष्ण विखे पाटील बोलले होते. त्यावर थोरात यांनी पलाटवर करत नैराश्येतून राधाकृष्ण विखे पाटील यांचे बोलणे येत असते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याला फारसे महत्व देऊ नका. शेवटी ते विरोधी पक्षाची भूमिका बजावत असताना नैराश्यातून बोलत असतात. शेवटी तो मानवी स्वभाव आहे असे थोरात यांनी म्हंटले आहे.

गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला करत दगडफेक केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी दिल्ली नाका परिसरात घडली. ही घटना दुर्दैवी आहे. असे घडायला नको होते. सर्व प्रशासन यंत्रणा पोलिसांसह काम करते आहे ते काम नागरिकांच्या हिताकरिता आहे असे थोरात म्हणाले.  

Web Title: Don’t pay attention to what say vikhe Balasaheb Thorat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here