Akola Accident News: बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात, बस आणि विजयराज शिंदे यांच्या फॉर्च्युनर गाडीची धडक.
अकोला: अकोल्यात बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. अकोल्याहून अमरावतीकडे जात असताना कुरणखेड जवळ बस आणि विजयराज शिंदे यांच्या फॉर्च्युनर गाडीची धडक झाली. या अपघातात विजयराज शिंदे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भाजप नेते आणि बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. अकोल्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप नेते अनिल बोंडे यांची भेट घेवून ते अमरावतीकडे निघाले होते.
यावेळी कुरणखेडजवळ त्यांच्या गाडीला समोरुन येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली. या अपघातात विजयराज शिंदे हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर विजयराज शिंदे यांच्यावर अकोला शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Web Title: accident of MLA Vijayraj Shinde’s vehicle
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App