Home क्राईम पत्नीने डोळ्यात मिरचीची पूड टाकून नवऱ्याला दिला गळफास, मन सुन्न करणारी घटना

पत्नीने डोळ्यात मिरचीची पूड टाकून नवऱ्याला दिला गळफास, मन सुन्न करणारी घटना

Nashik Murder News : पत्नीने डोळ्यात मिरचीची पूड टाकून नवऱ्याला दिला गळफास, मन सुन्न करणारी घटना.

Murder Case wife put chilli powder in her eyes and hanged her husband

नाशिक: न्यायडोंगरी येथे पत्नीने मुलाच्या सहाय्याने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी पत्नी व मुलाला अटक केली असून मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  येथील वृंदावननगर येथे राहणारा संजय गणेश गायकवाड (३७) हा रात्री नेहमीच दारू पिऊन घरात पत्नी व मुलांना मारहाण करीत असे. गुरुवारी (ता.५) रात्री अकराच्या सुमाराला संजय दारू पिऊन आला व त्याने पत्नी मुलाला मारहाण केली. सततच्या मारहाण व त्रासाला कंटाळलेल्या पत्नी उषा हिने दारूच्या नशेत असलेल्या संजयच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली.

मुलगा अविनाश याने नायलॉन दोरीने गळफास लावून संजयचा खून केला. संजयची आई मीराबाई हिने आपल्या मुलाची हत्या झाल्याची फिर्याद पोलिसात दाखल केल्याने पोलिसांनी मायलेकाला अटक केली.

उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख, नांदगाव पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज वाघमारे तपास करीत आहेत. दरम्यान मयत संजय गायकवाड यांच्यावर न्यायडोंगरी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Murder Case wife put chilli powder in her eyes and hanged her husband

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here