Home महाराष्ट्र Accident: संभाजी भिडेंचा अपघात; खुब्याला मार

Accident: संभाजी भिडेंचा अपघात; खुब्याला मार

Accident of Sambhaji Bhide

सांगली | Sangali: नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सांगलीमध्ये अपघात (Accident)  झाल्याची माहिती समोर आली आहे. सायकल चालवत असताना चक्कर आल्याने संभाजी भिडे अचानक जमिनीवर पडले. या अपघातात त्यांना कमरेखाली खुब्याला मार लागला असून ते गंभीररीत्या जखमी (injured) झाले आहेत. सध्या त्यांच्यावर सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे.

सांगली शहरातील गणपती पेठ येथे असणाऱ्या गणपती मंदिरात संभाजी भिडे नित्यनियमाने सायकलवरूनच दर्शनासाठी जात असतात. आजही नेहमीप्रमाणे मंदिरात जात असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते सायकलवरुन खाली पडले. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख असणारे संभाजी भिडे वादग्रस्त विधानाने चर्चेत राहत असतात.  

Web Title: Accident of Sambhaji Bhide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here