Home अकोले भंडारदरा पर्यटनाहून परतताना विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात; बसच पुढचे टायर निखळलं अन्…

भंडारदरा पर्यटनाहून परतताना विद्यार्थ्यांच्या बसचा भीषण अपघात; बसच पुढचे टायर निखळलं अन्…

Ahmednagar News: विद्यार्थ्यांच्या खाजगी बसला भीषण अपघात (Accident).

accident of student bus while returning from Bhandardara tourism

शिर्डी: गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसुन येत आहे. भंडारदरा पर्यटनाहून औरंगाबादच्या दिशेने परतत असताना शिर्डी नजीक विद्यार्थ्यांच्या खाजगी बसला भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. बसचे पुढचे टायर निखळल्याने बंद पडलेल्या टोल नाक्यावर बस गेली. हा भीषण अपघात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

बसमध्ये 40 विद्यार्थी आणि सहा शिक्षक होते. छत्रपती संभाजी नगर येथील तापडिया कोचिंग इन्स्टिट्यूटचे हे विद्यार्थी होते. या अपघातात काही विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.

भंडारदरा पर्यटनाहून औरंगाबादच्या दिशेने परतत असताना पिंप्री निर्मळ टोलनाक्यावर बसला अपघात झाला आहे. मुख्य दरवाजा लॉक झाल्याने विद्यार्थी बसमध्ये अडकले होते. स्थानिक युवकांनी मदतकार्य करत विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढले. लोणी पोलीसांनी पर्यायी बसची व्यवस्था करत विद्यार्थ्यांना संभाजी नगरकडे रवाना केले आहे.

Web Title: accident of student bus while returning from Bhandardara tourism

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here